महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बोहल्यावर चढण्यापूर्वी वधू-वराचे पाणी फाऊंडेशनमध्ये श्रमदान - पाणी फाऊंडेशन

तालुक्यातील अंजनविहीरे गावातील एका वधू-वराने बोहल्यावर चढण्यापूर्वी पाणी फाऊंडेशनमध्ये श्रमदान केले आहे.

बोहल्यावर चढण्यापूर्वी वधू-वराचे पाणी फाऊंडेशनमध्ये श्रमदान

By

Published : Apr 24, 2019, 5:22 PM IST

धुळे- तालुक्यातील अंजनविहीरे गावातील एका वधू-वराने बोहल्यावर चढण्यापूर्वी पाणी फाऊंडेशनमध्ये श्रमदान केले आहे. दुष्काळाला हरविण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्यावतीने या गावात सध्या श्रमदान सुरू आहे. या श्रमदानात वधू-वराने श्रमदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

बोहल्यावर चढण्यापूर्वी वधू-वराचे पाणी फाऊंडेशनमध्ये श्रमदान

दुष्काळाला हरवण्यासाठी अभिनेता आमीर खान यांनी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेला धुळे तालुक्यातदेखील सुरुवात झाली आहे. या स्पर्धेला सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत असून विविध गावांनी या स्पर्धेत उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला आहे. धुळे तालुक्यातील अंजनविहीरे या गावानेदेखील या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

या गावात संदीप आणि अंजली यांचा विवाह संपन्न होणार होता. या वधू-वराच्या अंगाला हळदही लागली होती. तरीही या दोघांनी आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून बोहल्यावर चढण्यापूर्वी श्रमदान करून स्पर्धेत योगदान दिले. दुष्काळाची झळ आपल्याला सोसावी लागत आहे. ती पुढच्या पिढीला बसू नये, यासाठी आपण पुढाकार घेतल्याचे या जोडप्याने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details