महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यात आणखी ८ जणांना कोरोनाची लागण, जिल्ह्यातील बाधितांची संख्या 338 वर

धुळ्याच्या जिल्हा रुग्णालयात प्राप्त ४० अहवालांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ३८ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नव्याने सापडलेल्या रुग्णांसह जिल्ह्यातील

धुळ्यात आणखी ८ जणांना कोरोनाची लागण
धुळ्यात आणखी ८ जणांना कोरोनाची लागण

By

Published : Jun 11, 2020, 7:52 PM IST

धुळे -जिल्हा रुग्णालय येथील प्राप्त ४० अहवालात कोरोनाचे ८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे, धुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३३८ वर पोहोचली आहे. तर, आतापर्यंत १५६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून २८ जणांचा मृत्यू झाला आहे.

धुळे जिल्हा रुग्णालय येथील प्राप्त ४० अहवालात ८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ३८ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे, धुळे जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या ३३८ झाली असून आतापर्यंत १५६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, २८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला असून उर्वरित १५४ जणांवर उपचार सुरू आहेत.

नव्याने आढळलेल्या ८ रुग्णांची माहिती -

१) ५२ वर्ष / महिला दहिवेल साक्री
२) २४ वर्ष / महिला एकता चैक साक्री
३) २६ वर्ष / महिला एकता चैक साक्री
४) २८ वर्ष / महिला एकता चैक साक्री
५) ५ वर्ष / मुलगा चांदतारा मोहल्ला साक्री
६) २६ वर्ष / महिला काझी प्लॉट धुळे
७) ६३ वर्ष / पुरुष इस्लाम पुरा देवपूर धुळे
८) २१ वर्ष / महिला गजानन कॉलनी धुळे

यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही आरोग्य यंत्रणेसाठी चिंता वाढवणारी ठरत आहे. सध्या दिवसेंदिवस होणाऱ्या वाढीला रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details