धुळे -शिरपूर तालुक्यातील भामपूर येथे बाळाला अंघोळ घालताना अंगणात पाणी गेल्याच्या किरकोळ कारणावरून मोठा वाद झाला. या वादात एका 27 वर्षीय महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अंगणात पाणी गेल्याच्या कारणावरून शेजाऱ्यांचा 27 वर्षीय महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न - जाळूण मारण्याचा प्रयत्न
भामपूर येथे अंगणात अंघोळीचे पाणी गेल्याने शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. या वादात एका 27 वर्षीय महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत पीडित महिला 40 टक्क्यांपेक्षा जास्त भाजल्याचा अंदाज आहे.
अंगणात अंघोळीचे पाणी गेल्याने शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. या वादात शेजारच्या काही तरुणांनी एकत्र येऊन पीडित महिलेला आणि तिच्या पतीला मारहाण केली. नंतर महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या घटनेत पीडित महिला 40 टक्क्यांपेक्षा जास्त भाजल्याचा अंदाज आहे. भाजलेली महिला आणि तिच्या जखमी पतीला तत्काळ धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शिरपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून संबंधितांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.