धुळे - संपूर्ण राज्यात इंधन दरवाढीविरोधात विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. इंधन दरवाढ विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने धुळे शहरात चूल आणि गौऱ्याची विक्री करत अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ निर्णयाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
इंधन दरवाढ : राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने चूल आणि गौऱ्याची विक्री करत अनोखे आंदोलन - dhule NCP on fuel price hike
इंधन दरवाढ विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने धुळे शहरात चूल आणि गौऱ्याची विक्री करत अनोखे आंदोलन करण्यात आले.
![इंधन दरवाढ : राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने चूल आणि गौऱ्याची विक्री करत अनोखे आंदोलन NCP movement against fuel price hike at dhule](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10824487-253-10824487-1614592480447.jpg)
इंधन दरवाढ : राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने चूल आणि गौऱ्याची विक्री करत अनोखे आंदोलन
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने इंधन दरवाढीचा निषेध
संपूर्ण देशात एकीकडे महागाईचा भडका उडालेला असताना दुसरीकडे या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यावर केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरातही मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. यामुळे विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
धुळे राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा बोलताना...
हेही वाचा -धुळे जिल्ह्यात भाजपा व काँग्रेसचे वर्चस्व कायम; शिवसेनेची मुसंडी