धुळे - विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यास आम्ही भाग पाडू, भाजपने देखील त्याची तयारी दाखवावी असे आवाहन राष्ट्रवादीचे निरीक्षक उमेश पाटील यांनी केले. अमेरिकेसारख्या देशातही निवडणूका बॅलेट पेपरवर होतात. त्यामुळे राज्यातही निवडणूका बॅलेट पेपरवर व्हाव्यात अशी मागणी यावेळी पाटील यांनी केली.
विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यास भाग पाडू - उमेश पाटील - dhule city
विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यास आम्ही भाग पाडू, भाजपने देखील त्याची तयारी दाखवावी असे आवाहन राष्ट्रवादीचे निरीक्षक उमेश पाटील यांनी केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने उमेदवारांची चाचपणी करण्याच्या हेतूने धुळ्यात पक्षाचे निरीक्षक उमेश पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
धुळे शहर आणि धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत बैठक घेऊन पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. विधानसभा निवडणुकीत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची आग्रही मागणी यावेळी पाटील यांनी केली. गरज पडल्यास या निवडणुकीवर आम्ही बहिष्कार देखील घालू असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला. मतदानाच्या दिवशी आमचे कार्यकर्ते ईव्हीएम मशीन फोडून आंदोलन करतील असेही पाटील म्हणाले. त्यामुळे निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या, अशी मागणी उमेश पाटील यांनी केली.