महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे : राष्ट्रवादीचे आमदार पडळकर यांच्या फोटोला 'जोडे मारो आंदोलन' - गोपीचंद पडळकर आणि शरद पवार बातमी

धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शहरातील क्रीडा संकुल येथे आमदार पडळकर यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. यावेळी पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले.

धुळे: राष्ट्रवादीचं पडळकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
धुळे: राष्ट्रवादीचं पडळकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

By

Published : Jun 25, 2020, 4:28 PM IST

धुळे - भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेध करण्यात आला. धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने पडळकर यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन करून त्या फोटोचे दहन करण्यात आले. तसेच, पडळकर यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशाराही राष्ट्रवादीच्या वतीने यावेळी देण्यात आला.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याविषयी बेताल वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून त्यांचा निषेध व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी आंदोलन करून पडळकर यांच्या प्रतिकात्मक फोटोचे, पुतळ्याचे दहन करण्यात येत आहे. धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील क्रीडा संकुल येथे आमदार पडळकर यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून आंदोलन करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले.

पडळकर यांनी शरद पवारांविषयी केलेल्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करत असून त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीच्या वतीने यावेळी देण्यात आला. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांची माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details