महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यातील नकाने तलाव पूर्ण क्षमतेने भरला, तरीही 8 दिवसाआड पाणीपुरवठा - dhule nakane dam overflow 2019

तब्बल 8 वर्षांनी शहरातील नकाने तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो वाहत आहे. याच नकाने तलावाच्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. मात्र, तरीही शहराला 8 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

धुळ्यातील नकाने तलाव पूर्ण क्षमतेने भरला

By

Published : Sep 16, 2019, 1:54 PM IST

धुळे - तब्बल 8 वर्षांनी शहरातील नकाने तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. याच नकाने तलावाच्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. मात्र, तरीही शहराला 8 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर 1 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा -शेतकरी आत्महत्या प्रकरणी खासदार ओमराजे निंबाळकरांवर गुन्हा दाखल

जिल्ह्यात यंदा पावसाने दमदार हजेरी लावली. सप्टेंबर महिन्यापर्यंत 139 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे अक्कलपाडा धरणात पाणीसाठा वाढले आहे. त्यामुळे पाणी नकाने तलावात विसर्ग करण्यात आले असल्याने नकाने तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तब्बल 8 वर्षांनी नकाने तलाव ओव्हरफ्लो भरून वाहत आहे. मात्र, भर पावसाळ्यात देखील शहरात तब्बल 8 दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे. तसेच काही भागात अजूनही टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहरात 1 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details