महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यात फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या प्रतिमेस लाथा मारून मुस्लिम बांधवांनी केला निषेध - फ्रांसमधील वादांची कारणे

धुळे शहरातील अलहमिन ग्रुप तर्फे मुस्लिम बांधव एकत्र आले. यावेळी फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या प्रतिमेस चपला व लाथा मारून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत या सर्व प्रकाराचा निषेध नोंदविला आहे.

dhule protest
धुळे आंदोलन

By

Published : Oct 31, 2020, 9:30 PM IST

धुळे - फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅनुअल मॅक्रॉन यांनी इस्लाम धर्माविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. तसेच काही इस्लामिक देशांनी फ्रान्सच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत आहे.

पॅरिसमध्ये झालेल्या हत्येनंतर या वादाला सुरुवात झाली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धडा शिकवताना शिक्षकाने चार्ली हेब्दोमध्ये प्रकाशित झालेल्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखवले होते. त्यानंतर एका कट्टर मुस्लिम युवकाने त्या शिक्षकाची हत्या केली. त्यामुळे पूर्ण फ्रांसमध्ये खळबळ माजली आहे.

त्याच पार्श्वभूमीवर आज धुळे शहरातील अलहमिन ग्रुप तर्फे मुस्लिम बांधव एकत्र आले. यावेळी फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या प्रतिमेस चपला व लाथा मारून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत या सर्व प्रकाराचा निषेध नोंदविला आहे. त्याचबरोबर निषेध कर्त्यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर मुस्लीम धर्मात ज्या पद्धतीने शासन केले जाते, त्याच पद्धतीने कारवाई देखील करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details