महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यामध्ये पंक्चर काढणाऱ्याची अज्ञाताकडून हत्या - dhule murder

मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अन्सारी मृत अवस्थेत एकाला दिसून आला. यानंतर त्याने अन्सारीच्या पळासनेर येथे राहणाऱ्या भावाला खून झाल्याची माहिती दिली.

पंक्चर काढणाऱ्याची अज्ञाताकडून हत्या

By

Published : Sep 17, 2019, 4:25 PM IST

धुळे - शिरपूर मुंबई-आग्रा महामार्गावर पळासनेर ते सांगवी दरम्यान असलेल्या पनाखेड गावाच्या शिवारात पंक्चरचे दुकान चालवणाऱ्याचा खून झाल्याची घटना घडली. खून झालेला व्यक्ती बिहारमधील आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा -धुळे विधानसभा आढावा : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अनिल गोटे राखणार का गड?

नौसाद साकीर अन्सारी (वय ४५), असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जिल्ह्यातील शिरपूर मुंबई-आग्रा महामार्गावर पनाखेड गावाच्या शिवारात नौसाद अन्सारीचे पंक्चर दुकान आहे. तो पंक्चर दुकानातच राहत होता. दुकानाच्या बाजूलाच एक चहाचे हॉटेल आहे. मंगळवारी रात्री दगडाने ठेचून अन्सारीचा खून झाल्याची घटना घडली.

पंक्चर काढणाऱ्याची अज्ञाताकडून हत्या

हेही वाचा - धुळ्यातील नकाने तलाव पूर्ण क्षमतेने भरला, तरीही 8 दिवसाआड पाणीपुरवठा

मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अन्सारी मृत अवस्थेत एकाला दिसून आला. यानंतर त्याने अन्सारीच्या पळासनेर येथे राहणाऱ्या भावाला खून झाल्याची माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details