धुळे- शिंदखेडा तालुक्यातील रामी या गावात २ गटात झालेल्या हाणामारीत एका ३८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजकीय वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मनोज महाजन असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीचा खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालय आवारात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत नातेवाईकांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील रामी या गावात २ गटात वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत या गावातील मनोज उत्तम महाजन ( वय ३८) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत मनोज महाजन यांच्या नातेवाईकांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.