धुळे -मराठा समाजाला मिळालेले यश हे आंदोलांकर्त्यांचे असून आम्ही या निकालावर समाधानी आहोत, अशी प्रतिक्रिया धुळे शहरातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना दिली. मराठा समाजाच्या आरक्षणावर आज मुंबई उच्च न्यायालयात महत्वपूर्ण निर्णय देण्यात आला. या निकालानंतर मराठा समाज बांधवांमध्ये आनंदचे वातावरण पसरले आहे.
'हा' निकाल आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांना समर्पित - मराठा क्रांती मोर्चा - आनंदचे वातावरण
मराठा समाजाच्या आरक्षणावर आज मुंबई उच्च न्यायालयात महत्वपूर्ण निर्णय देण्यात आला. याप्रसंगी धुळे शहरातील मराठा क्रांती मूक मोर्चाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
धुळे शहरातील मराठा क्रांती मूक मोर्चाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मराठा समाजाला मिळालेलं हे यश संपूर्ण समाज बांधवांचे आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांना हे आरक्षण आम्ही समर्पित करीत आहोत. या आरक्षणाचा फायदा समाजातील तरुणांना होणार असून आम्ही आमच्या हक्कासाठी भांडत होतो. आम्ही आज या निकालावर आनंदी आहोत, तसेच आमचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे अशी भावना मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.