धुळे-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयाविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने धुळ्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. परंतु रद्द झालेली राज्यसेवा पूर्व परीक्षा २१ मार्च रोजी होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच १४ मार्चच्या ऑनलाईन अर्जप्रणालीवर परीक्षार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असे आयोगाने म्हटले आहे.
धुळे: एमपीएससी परिक्षा रद्द केल्याच्या निषेर्धात अभाविपचा रास्तारोको - mpsc student agitation in dhule
राज्य लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा १४ मार्च रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दोन दिवस आधीच अर्थात गुरुवारी ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरातून राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते.
![धुळे: एमपीएससी परिक्षा रद्द केल्याच्या निषेर्धात अभाविपचा रास्तारोको अभिविप](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10978422-93-10978422-1615547201169.jpg)
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने आंदोलन
प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न बघणारे अनेक तरुण महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत असतात. मात्र, २०२० साली होणारी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तसेच मराठा आरक्षणाच्या विषयामुळे लांबणीवर पडत होती. या परीक्षेच्या वारंवार तारखा बदलण्यात येत होत्या अखेर राज्य लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा १४ मार्च रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दोन दिवस आधीच अर्थात गुरुवारी ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरातून राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत येत्या आठ दिवसात परीक्षा घेण्याचे आश्वासन दिले होते. १४ मार्च रोजी होणारी राज्य लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने धुळे शहरातील सावरकर पुतळा परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ही परीक्षा १४ मार्च रोजी घेण्यात यावी, या मागणीवर विद्यार्थी ठाम होते.
पोलीस अधीक्षकांनी घेतली भेट
या आंदोलनाची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी आंदोलनस्थळी येत विद्यार्थ्यांची भेट घेतली. येत्या आठ दिवसात परीक्षा होणार असून विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आंदोलनामुळे वाहतूक कोंडी
आंदोलन करण्यात आलेला परिसर अत्यंत महत्वाचा तसेच वर्दळीचा असल्याने या ठिकाणी आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.