धुळे - खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी, राज्य सरकारकडे मालेगाव शहराला 'रेड झोन' घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. खासदार भामरे यांनी मुख्यंमत्री आणि आरोग्य मंत्र्यांना त्याबाबत सूचना दिली आहे.
"नागरिक प्रतिसाद देत नसल्यामुळे मालेगाव शहराला रेड झोन म्हणून घोषित करावे" - malegaon corona hotspot
मालेगाव शहरातील जनतेच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या हितासाठी मालेगावला रेड झोनमध्ये टाकण्याची मागणी डॉ भामरे यांनी केली आहे. या शहरातील जनता कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करायला तयार दिसत नाही असे त्यांनी सांगितले.
डॉ सुभाष भामरे
मालेगाव शहरातील जनतेच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या हितासाठी मालेगावला रेड झोनमध्ये टाकण्याची मागणी डॉ भामरे यांनी केली आहे. या शहरातील जनता कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करायला तयार दिसत नाही, त्यातच कोरोनाचे रुग्ण वाढल्याने मालेगाव हे हॉटस्पॉट झाले आहे. अशावेळी शहर सील केले जाणे गरजेचे असून, वेळप्रसंगी केंद्रीय राखीव जवानांचे (सीआरपीफ) पाचारण करण्यात यावे, अशी मागणीही डॉ. भामरे यांनी केली आहे.