महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिरपूर तालुक्यात सव्वाआठ लाखांचा गांजा जप्त

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान येथे शिरपूर तालुका पोलिसांनी छापा टाकून एका घरातून 143 किलो सुक्या गांजासह 140 किलो गांजाची बियाणे जप्त केली.

जप्त मुद्देमालासह पोलीस पथक
जप्त मुद्देमालासह पोलीस पथक

By

Published : Aug 29, 2020, 5:55 PM IST

धुळे -जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान येथे शिरपूर तालुका पोलिसांनी छापा टाकून एका घरातून 143 किलो सुक्या गांजासह 10 किलो गांजाचे बियाणे असा एकूण 8 लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

लाकड्या हनुमान (ता. शिरपूर) येथे चंदनसिंग रामश्या पावरा याने त्याच्या राहत्या घरात चोरटी विक्री करण्यासाठी गांजा ठेवला असल्याची गुप्त माहिती शिरपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार, पोलीस नाईक पवन गवळी, पोलीस नाईक संजीव जाधव, प्रविण धनगर, पोलीश शिपाई आरिफ पठाण, संदीप शिंदे, सिध्दांत मोरे, ज्योती गवळे यांचे पथक स्थापन करुन या पथकासह पाटील यांनी त्याच्या घरावर छापा टाकला.

या ठिकाणी घरातील धान्य साठवून ठेवण्याच्या कोठ्यांमध्ये 7 लाख 15 हजार रुपये किमतीचा 143 किलो सुका गांजा, 1 लाख रुपये किंमतीचा 10 किलो गांजा लागवडीसाठीचे बियाणे, असा एकूण 8 लाख 15 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांना मिळाला.

संशयित आरोपी चंदनसिंग पावरा हा पोलिसांची चाहुल लागताच पसार झाला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे यांनी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवर चंदनसिंग रामश्या पावरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत, अशी माहिती अभिषेक पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली.

हेही वाचा -धक्कादायक; ट्रकमध्ये चनादाळ, हार्डवेअरच्या गोण्यांखालून गुटख्याची तस्करी

ABOUT THE AUTHOR

...view details