महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे एसटी आगाराने मिळवले 80 लाखांहून अधिक उत्पन्न - धुळे बसस्थानक बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टाळेबंदीत एसटी बंद होती. दरम्यान मागील 3 महिन्यात एसटीच्या धुळे विभागाने माल वाहतूक करत 22 लाख 12 हजार 684 रुपये व मागील दहा दिवसांत प्रवासी वाहतूक करत 58 लाख 38 हजार 698 रुपये, असे एकुण 80 लाख 51 हजार 382 रुपयांचे उत्पन्न मिळवले.

st bus
एसटी बस

By

Published : Sep 3, 2020, 3:50 PM IST

Updated : Sep 3, 2020, 7:01 PM IST

धुळे - राज्य परिवहन महामंडळाच्या आंतरजिल्हा वाहतुकीला सुरुवात झाल्यानंतर गेल्या दहा दिवसात धुळे विभागाने प्रवासी वाहतूक सुरू करत 58 लाख 38 हजार 698 रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. तर मालवाहतूक करत गेल्या तीन महिन्यात 22 लाख 12 हजार 684 रुपये, असे एकुण 80 लाख 51 हजार 382 रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. दहा दिवसांत 3 लाख 55 हजार 490 किलोमीटर प्रवास करत कर 55 हजार प्रवाशांची वाहतूक धुळे विभागाच्या एसटी बसने केली आहे.

धुळे एसटी आगाराने मिळवले 80 लाखांहून अधिक उत्पन्न

कोरोनाचा सर्वात जास्त फटका राज्य परिवहन महामंडळला सहन करावा लागला असून आंतरजिल्हा वाहतुकीला सुरुवात झाल्यानंतर वाहतूक परवानगीचे व कोणतीही भाडेवाढ नसल्याने प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत करत राज्य परिवहन महामंडळाला उत्तम प्रतिसाद दिला आहे. तसेच 6 ते 13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या एनडीए व नीट या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ज्यादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षांर्थी विद्यार्थ्यांनी 22 जणांचा ग्रुप असल्यास नजीकच्या आगाराशी संपर्क साधण्याचे आवाहन धुळे आगाराच्यावतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यांतर्गत प्रवास करताना बसमध्ये फक्त 22 मर्यादित प्रवाशांसह सामाजिक अंतर राखून तोंडावर मास्क बांधण्याचे बंधन पाळून प्रवासात मुभा देण्यात आली आहे. आंतरजिल्हा वाहतुकीला सुरुवात झाल्यानंतर गेल्या दहा दिवसात प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून गेल्या दहा दिवसात धुळे विभागाने 3 लाख 55 हजार 490 किलोमीटर चालवून तब्बल 55 हजार प्रवाशांची वाहतूक करत 58 लाख 38 हजार 698 रुपये महसूल मिळविला आहे. मालवाहतूक करून गेल्या तीन महिन्यात 22 लाख 12 हजार 684 रुपये असा एकूण 80 लाख 51 हजार 300 रुपयांचा महसूल धुळे एसटी विभागाने प्राप्त केला आहे. महामंडळाने कोणतीही भाडेवाढ न करता प्रवासी सेवा सुरू केली असल्याने याचा लाभ सर्वसामान्य प्रवाशांनी घेत आपला प्रवास सुखकर बसने करण्याचे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

हेही वाचा -शिरपूर तालुक्यात सव्वाआठ लाखांचा गांजा जप्त

Last Updated : Sep 3, 2020, 7:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details