महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष समितीचा धुळ्यात मोर्चा - धुळे ओबीसी मोर्चा न्यूज

विविध प्रलंबित मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष समिती व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने धुळे शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत लक्षवेधी मोर्चा काढण्यात आला.

विविध मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष समितीचा धुळ्यात मोर्चा
विविध मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष समितीचा धुळ्यात मोर्चा

By

Published : Dec 1, 2020, 7:04 PM IST

धुळे -विविध प्रलंबित मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष समिती व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून ते धुळे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत लक्षवेधी मोर्चा काढण्यात आला.

विविध मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष समितीचा धुळ्यात मोर्चा
हेही वाचा -'स्वाभिमानी'चा दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा; पुतळा जाळून केले केंद्र सरकारविरोधात आंदोलन

या मागण्यांसाठी काढण्यात आला मोर्चा

ओबीसी आरक्षणात कोणतीही विविध फेरबदल करू नये व आरक्षणाची संघर्ष टक्केवारी कमी करू नये. ओबीसी संवर्गातील जातींची संख्या वाढल्याने यांच्या आरक्षणाच्या टक्केवारीत वाढ करावी. ओबीसी संवर्गाला शासकीय नोकऱ्यांमध्ये पदोन्नती देण्यात यावी. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना पूर्ण 100% फी माफ करावी. ओबीसी संवर्गाची जनगणना व्हावी. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे.

ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करावे. अशा विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज ओबीसी संघर्ष समिती तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लक्षवेधी मोर्चा काढण्यात आला.

पारंपारिक वाद्यांनी वेधून घेतले लक्ष

समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात समाजबांधवांनी पारंपारिक वाद्य वाजवत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेतले.

हेही वाचा -पदवीधर रणधुमाळी : फडणवीसांच्या बोटाला शाई लावायला विसरले अधिकारी

ABOUT THE AUTHOR

...view details