धुळे - शहरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडताच पालिका प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यासाठी युद्धपातळीतवर तयारी सुरू झाली आहे. यासाठी तिरंगा चौक परिसर सील करण्यात आला आहे. तसेच खबरदारी म्हणून याच परिसरातील आमदार फारुख शहा यांचे कार्यालय देखील सील करण्यात आले आहे.
आमदार फारुख शहांचे कार्यालय 'सील'; कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने खबरदारी - corona in dhule
शहरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडताच पालिका प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यासाठी युद्धपातळीतवर तयारी सुरू झाली आहे. यासाठी तिरंगा चौक परिसर सील करण्यात आला आहे.
आमदार फारुख शहांचे कार्यालय 'सील'; कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने खबरदारी
कोरोनाबाधित सापडलेल्या परिसरात फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच या रुग्णाच्या संपर्कातील पंधरा ते वीस जणांची तपासणी सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून देखील खबरदारी घेण्यात येत आहे. पुढील दोन दिवस धुळे शहरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.