महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे: पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी शिरपुरात निघाला मोर्चा - shirpur protest against rape accused

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील करंवद येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल होवून महिना उलटला तरीही आरोपीला अटक झालेली नाही. उलट पीडितेच्या नातेवाईकांवर खोटा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

dhule shirpur rape case
धुळे: पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी शिरपूरात निघाला मोर्चा

By

Published : Feb 14, 2020, 11:46 AM IST

Updated : Feb 14, 2020, 3:14 PM IST

धुळे - जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील करंवद येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावी आणि फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी पीडितेच्या नातेवाईक आणि करवंद ग्रामस्थांनी शिरपूर शहरातून शुक्रवारी मोर्चा काढला. मोर्च्यामध्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

धुळे: पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी शिरपुरात निघाला मोर्चा

हेही वाचा -

भारत बंदवेळी दगडफेक करणारे नऊ जण पोलिसांच्या ताब्यात

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील करंवद येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल होवून महिना उलटला तरीही आरोपीला अटक झालेली नाही. उलट पीडितेच्या नातेवाईकांवर खोटा गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक होवून पीडितेला न्याय मिळवून द्यावा, आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहीजे, यासह विविध मागण्यांसाठी पीडितेच्या नातेवाईकांनी व करवंद ग्रामस्थांनी शुक्रवारी शिरपूर शहरातून मोर्चा काढला. शिरपूर शहरातील गुजराथी कॉम्लेक्स येथून निघालेला मोर्चा थेट डीवायएसपी कार्यालयावर धडकला. या मोर्चात मोठ्या संख्येने महिला पुरुषांसह करवंद ग्रामस्थ सहभागी झाले होते.

मोर्चेकर्‍यांनी डीवायएसपी माने यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, आरोपी तेजस किशोर पाटील याच्याविरुध्द 2 जानेवारीला गुन्हा दाखल झाला. मात्र, महिना उलटूनही त्याला अजून अटक झालेली नाही. उलट आरोपीचे वडील किशोर पाटील यांनी दबाव आणण्यासाठी तक्रारदाराच्या नातेवाईकांविरुध्द शिरपूर पोलीस ठाण्यात कलम 307 अन्वये खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. किशोर पाटील यांना तक्रारदाराच्या नातेवाईकांनी विषारी द्रव पाजल्याचा हा गुन्हा आहे. तसेच आरोपी तेजस पाटील हा गुन्ह्यातील सर्व पुरावे नष्ट करेल व पीडितेला न्याय मिळण्यास विलंब होईल. याकरीता त्याला तात्काळ अटक करावी, आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहीजे, पीडितेसह तिच्या नातेवाईकांना संरक्षण द्यावे. तसेच नातेवाईकांवरील दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत. विषारी द्रव पाजल्याच्या गुन्ह्याचा सखोल तपास करुन हा गुन्हा खोटा असल्यास किशोर पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हेही वाचा -

चारित्र्याच्या संशयातून विवाहितेची हत्या, फोन करून पतीनेच दिली माहिती

Last Updated : Feb 14, 2020, 3:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details