महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

policeman suicide : मंत्रालयाच्या सुरक्षा विभागातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Policeman Suicide Reason Unclear

मंत्रालयाच्या सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली ( Ministry Security Department Police Suicide ) आहे. साक्री तालुक्यातील मूळ गावी असताना बैलाच्या गोठ्यात त्यांनी गळफास घेतला. पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

suicide
आत्महत्या

By

Published : Dec 9, 2022, 10:21 AM IST

धुळे :मंत्रालयाच्या सुरक्षा विभागातील ५७ वर्षीय पोलीस कर्मचारी काळूराम चैत्राम अहिरे यांनी गळफास घेऊन आत्नहत्या केली ( Ministry Security Department Police Suicide ) आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील मूळ गावी असतांना गळफास घेऊन आत्महत्या ( Policeman Commits Suicide By Hanging ) केली. आत्महत्येचे कारण कळू शकलेलं नाही. पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची अकस्मात मृत्यू अन्वये नोंद करण्यात आली आहे.

मुंबईला जाणार होते :धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पोहबारा येथील ते मूळ रहिवाशी होते. सध्या ते कल्याण येथील विजय नगर भागातील विशाल नगरी अपार्टमेंट येथे राहतात. मुंबई मंत्रालयाच्या सुरक्षा विभागातील ५७ वर्षीय कर्मचारी काळूराम चैत्राम अहिरे काम करतात. ८ डिसेंबर २०२२ या दिवशी त्यांच्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील मूळगावी ते होते. तेव्हा त्यांनी भाऊ आणि घरातील सदस्य कांद्याचे रोप लावण्यासाठी जात असतांना मी आज मुंबईला जाणार आहे असे काळूराम चैत्राम अहिरे यांनी भावाला सांगितले. हा निरोप एकूण भाऊ घरातील सदस्यांसह शेतात निघून गेले. सायंकाळी ते शेतातून घरी परत आल्यावर साधारण सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट : जवळील बैलाच्या गोठ्यात भावाला काळूराम चैत्राम अहिरे यांनी छताला असलेल्या लाकडी दांड्याला सुती दोरीचा गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. पिंपळनेर पोलीस स्टेशनला या घटनेची अकस्मात मृत्यू अन्वये नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पी यु सोनवणे हे करत आहेत. पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकलेले ( Policeman Suicide Reason Unclear ) नाही.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details