धुळे - लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी देशाची निवड समिती होती, या समितीने परफॉर्मन्स बघून निर्णय घेतला. मागे मोदी लाट असल्यामुळे सर्वच निवडून आले, आता तसे होणार नाही. असे खळबळजनक वक्तव्य राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. एका पत्रकाराने प्रतिक्रिया घेण्यासाठी महाजन यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला असता त्यांनी हे वक्तव्य केले. या संभाषणाची ऑडिओ क्लिप ईटीव्ही भारतच्या हाती लागली आहे. काय म्हणाले गिरीष महाजन हे तुम्हीच ऐका.
मोदी लाटेत सर्वच निवडून आले; आता तसे होणार नाही, महाजनांची ऑडिओ क्लिप 'ईटीव्ही भारत'च्या हाती - गिरीश
एका पत्रकाराने प्रतिक्रिया घेण्यासाठी महाजन यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला असता त्यांनी हे वक्तव्य केले. या संभाषणाची ऑडिओ क्लिप ईटीव्ही भारतच्या हाती लागली आहे. काय म्हणाले गिरीश महाजन हे तुम्हीच ऐका.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आपल्याला तिकीट न मिळण्यामागे पालकमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप केला होता. या आरोपाबाबत एका पत्रकाराने गिरीश महाजन यांच्याशी संवाद साधून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना महाजन म्हणाले, उमेदवारांची निवड करण्यासाठी देशाची निवड समिती होती, या समितीत आपण नव्हतो, तसेच या समितीने परफॉर्मन्स बघून निर्णय घेतला आहे.
गिरीश महाजन यांच्या या उत्तरावर पत्रकाराने त्यांना विचारल की, मागील निवडणुकीत भारती पवार यांचा हरिश्चंद्र चव्हाण यांनी पराभव केला होता, याबाबत बोलताना महाजन म्हणाले, मागच्या वेळी मोदी लाट होती, यामुळे प्रत्येकजण २ लाख, ४ लाख मतांनी निवडून आला होता. यावेळी तसे नसेल असे खळबळजनक वक्तव्य महाजन यांनी यावेळी केले. या निवडणुकीत मोदी लाट नसेल असेच त्यांनी आपल्या बोलण्यातून सूचित केले.