धुळे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाऊन आहे. या काळात राज्यात अनेक परप्रांतीय कामगार अडकले आहेत. हे कामगार कोरोनाच्या भीतीने आपल्या राज्यात जात आहेत. धुळे जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यात जात आहेत. मात्र, या जाणाऱ्या नागरिकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा फेकला असून, यामुळे महामार्गावर घाणीचं साम्राज्य पसरलं आहे.
धुळे : परप्रांतीयांनी फेकलेल्या कचऱ्यामुळे महामार्गावर घाणीचं साम्राज्य - धुळे महार्गावर घाणीचं साम्राज्य
धुळे जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यात जात आहेत. मात्र, या जाणाऱ्या नागरिकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा फेकला आहे. यामुळे महामार्गावर घाणीचं साम्राज्य पसरलं आहे.
![धुळे : परप्रांतीयांनी फेकलेल्या कचऱ्यामुळे महामार्गावर घाणीचं साम्राज्य Dhule highway](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7224824-thumbnail-3x2-mum.jpg)
लॉकडाऊनच्या काळामध्ये बाहेरगावी अडकलेल्या परप्रांतीय नागरिकांना आपापल्या गावी परतण्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर सुटकेचा निश्वास सोडून, या परप्रांतीय मजुरांनी आपल्या गावी जाण्यासाठी धाव घेतली आहे. कामगार मिळेल त्या वाहनाने आणि मिळेल त्या ठिकाणी बसून जीवघेणा प्रवास करत आहेत. परंतू, ज्या-ज्या ठिकाणी हे परप्रांतीय नागरिक थांबत आहेत. त्या-त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य देखील पसरताना दिसत आहे.
धुळे शहरांमधून मुंबई-आग्रा महामार्गाने मध्यप्रदेशाच्या दिशेने प्रवास करणार्या परप्रांतीय नागरिकांनी धुळे शहरालगत असलेल्या टोल नाक्याजवळ अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरवले आहे. धुळे महानगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. लवकरात लवकर या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण या प्रवासी परप्रांतीयांमध्ये जर कोणी कोरोनाबाधित असतील आणि त्यांच्याकडून जर अशा पद्धतीने कचरा फेकण्यात आला असेल तर शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो अशी भिती निर्माण झाली आहे.