महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' मर्सिडीजचा मूळ मालक धुळ्यातील; फेब्रुवारीतच विकली होती कार - मर्सिडीज कार मालक धुळे

सचिन वाझें प्रकरणात जी मर्सिडीज कार जप्त केली आहे, त्या गाडीचे पाहिले मालक हे धुळ्यातील आहेत. मात्र याबाबत सारांश भावसार या गाडी मालकाने फेब्रुवारी महिन्यातच ही गाडी विकली गेल्याच सांगितले आहे. एका ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ही गाडी विकल्याचा दावा भावसार यांनी केला आहे.

मर्सिडीजचा मूळ मालक धुळ्यातील
मर्सिडीजचा मूळ मालक धुळ्यातील

By

Published : Mar 17, 2021, 12:41 PM IST

धुळे- अँटिलिया बाहेरील स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणाच्या तपासात इनोव्हा कारच्या समावेशानंतर एनआयएने एक मर्सिडीज बेन्झ जप्त केली आहे. ती मर्सिडीज कार(एमएच १८-बी आर-९०९५) निलंबीत अधिकारी सचिन वाझे हे वापरत होते. तसेच त्या गाडीचा पूर्वीचा मालक हा धुळे येथील असल्याचे समोर आले आहे. सारांश भावसार असे त्यांचे नाव आहे. मात्र, सारांश यांनी ती मर्सिडीज कार फेब्रुवारी महिन्यात विकली असून थेट वाझे यांना विकली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्या मर्सिडीजचा मूळ मालक धुळ्यातील;

सचिन वाझेंंना ओळखत नाही-

सचिन वाझें प्रकरणात जी मर्सिडीज कार जप्त केली आहे, त्या गाडीचे पाहिले मालक हे धुळ्यातील आहेत. मात्र याबाबत सारांश भावसार या गाडी मालकाने फेब्रुवारी महिन्यातच ही गाडी एका ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून विकल्याचा दावा केला आहे. मात्र, आपण सचिन वाझे यांना ओळखत नसल्याचेही सारांश यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी अद्याप तपास यंत्रणांकडून किंवा स्थानिक पोलिसांकडून आपल्याला संपर्क करण्यात आलेला नाही. मात्र एनआयएला आपण संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे आश्वासन सारंग भावसार यांनी दिले आहे. गाडी जप्त केल्यानंतर अनेक लोकांनी भावसार यांच्याशी संपर्क साधल्याची माहितीही त्यांनी दिली. या प्रकरणात तपास यंत्रणाना योग्य ते कागदपत्र सादर करण्याबरोबरच सहकार्य करणार असल्याचेही सारांश यांनी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details