महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शासनाने वीरपत्नींसाठी कामे करणे गरजेचे - वीरपत्नी पूजा पंडीत

महिलांनी स्वतःला कमी समजू नये. त्यांनी कितीही संघर्ष वाट्याला आला तरी न डगमगता धैर्याने उभे राहावे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

वीरपत्नी पूजा पंडीत

By

Published : Mar 8, 2019, 11:08 PM IST

धुळे -पती हुतात्मा झाल्यानंतर अतिशय संघर्षमय जीवनातून वाटचाल करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने वीरपत्नींसाठी काम करणे गरजेचे आहे. एवढेच नाही, तर शासनाची मदत वेळेत त्यांच्यापर्यंत पोहचणेही गरजेचे असल्याचे वीरपत्नी पूजा पंडीत यांनी म्हटले आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त त्या ईटीव्ही भारतशी बोलत होत्या.

पूजा पंडित यांचा २०१५ साली मयूर पंडित यांच्याशी विवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर २ वर्षातच मयूर पंडित यांना कर्त्यव्यावर असताना वीरमरण आले होते. मयूर पंडित यांना हौतात्म्य आले तेव्हा त्यांचा मुलगा अंश केवळ ९ महिन्यांचा होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरच्यांनीही पूजा यांची साथ सोडली. मात्र, पुजा न डगमगता अत्यंत धैर्याने मुलाचा सांभाळ करत आहेत. वीरपत्नींसाठी शासनाने मदत केली पाहिजे. तसेच त्यांना आर्थिक पाठबळ मिळणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.

महिलांनी स्वतःला कमी समजू नये. त्यांनी कितीही संघर्ष वाट्याला आला तरी न डगमगता धैर्याने उभे राहावे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details