धुळे -दरवर्षी 5 नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात तरुण कलावंतानी एकत्र येत नटराज पूजन केलं. यावेळी तरुण कलावंतानी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला.
मराठी रंगभूमी दिन: 'तरुण कलावंतांना प्रोत्साहन मिळणं गरजेचं' - artist on Marathi Theater Day in dhule
मराठी रंगभूमीच्या निमित्ताने धुळे जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात तरुण कलावंतानी सहभाग घेतला होता. यावेळी कलावंतानी आपली मतं व्यक्त केली.
मराठी रंगभूमी दिन: 'तरुण कलावंतांना प्रोत्साहन मिळणं गरजेचं'
शहरातली थंडावलेली नाट्य चळवळ पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं या तरुण कलावंतानी यावेळी सांगितलं. मात्र, या प्रयत्नांना जेष्ठ नाट्यकर्मींची साथ मिळावी, मार्गदर्शन मिळावे तसेच शहरात कलावंतांना संधी प्राप्त व्हावी, अशी अपेक्षा यावेळी तरुण नाट्यकर्मींनी व्यक्त केली.
पाहुयात कलाकारांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया...