महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dhule crime news खोटे नाव सांगून रिलेशनशिप करून बलात्कार, पती, सासरा विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल - police recruitment class

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस भरतीच्या क्लास मध्ये एका २४ वर्षीय युवतीशी ( police recruitment class ) मैत्री करून तिला फिरायला घेऊन जाऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध केला. तिच्या न कळतअर्धनग्न अवस्थेतील व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केले.

बलात्कार दाखल
बलात्कार दाखल

By

Published : Dec 2, 2022, 2:15 PM IST

धुळे : एका मुस्लिम तरुणाने एका २४ वर्षीय हिंदू तरुणीला खोटे नांव सांगून तिच्याशी रिलेशनशिप करून तिच्यावर बलात्कार केला .यात त्या तरुणाच्या बापाने देखील पीडितेवर अनैसर्गिक संभोग केला. तसेच त्या युवकाने पीडितेस मोटारसायकल च्या सायलन्सरचा चटका लावून दुखापत केली. सासूने देखील पीडितेचा शारीरिक, मानसिक छळ केल्याची घटना उघडकीस आली. धुळे शहरातील देवपूर पश्चिम पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

काय आहे प्रकरणपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस भरतीच्या क्लास मध्ये एका २४ वर्षीय युवतीशी ( police recruitment class ) मैत्री करून तिला फिरायला घेऊन जाऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध केला. तिच्या न कळतअर्धनग्न अवस्थेतील व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केले. युवक अर्षद सलीम मलिक हा मुस्लिम समाजाचा असतांना देखील त्यानं त्याचं नांव हर्षद माळी सागितले. पीडितेस अमळनेर येथे रिलेशनशिपचे कागदपत्रं तयार करून घेऊन तिला उल्हासनगर येथे घेऊन जाऊन तिच्याशी पुन्हा शरीर संबंध केले. सासरा सलीम मलिक याने पीडितेवर अनैसर्गिक संभोग केला.

अटक करण्याची कारवाईसासू तस्लिम सलीम मलिक हिने पीडितेचा शारीरिक, मानसिक छळ केला. तसेच पती अर्षद सलीम मलिक याने पीडितेने लग्नाची एक तोळे वजनाची पोत दिली नाही. पीडितेच्या हाताला मोटरसायकलच्या सायलन्सरचा चटका देऊन पीडीतेस दुखापत केली. तसेच शिवीगाळ, दमदाटी केली. देवपूर पश्चिम पोलीस स्टेशनला पिडीत युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. मात्र आरोपींना अटक करण्याची कारवाई सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितले

ABOUT THE AUTHOR

...view details