धुळे - जिल्हाधिकारी कार्यालयात शासनाच्या आदेशानुसार अत्यंत साध्या पद्धतीने महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत पार पडला. जिल्ह्याला कोरोना आजारातून लवकरच मुक्त करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी केले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते धुळ्यात ध्वजारोहण कार्यक्रम पडला पार - धुळे जिल्हाधिकारी कार्यालय
महाराष्ट्र दिनानिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सी, यांच्यासह ठराविक कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र दिनानिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सी, यांच्यासह ठराविक कर्मचारी उपस्थित होते. यावेळेस सोशल डिस्टन्स पाळत पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा साध्या पद्धतीने करण्यात आला. यावेळी अब्दुल सत्तार यांनी शहरात लावण्यात आलेल्या ड्रोन कॅमेराची पाहणी केली.
TAGGED:
धुळे जिल्हाधिकारी कार्यालय