महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे: जमनागिरी महादेव मंदिरात भाविकांची गर्दी - holly place

धुळे जिल्हा अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. धुळे शहर आणि जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक मंदिरे असून शहरातील जमनागिरी महादेव मंदिर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. श्रावण महिना सुरु असल्याने भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे.

महादेव मंदिर

By

Published : Aug 6, 2019, 8:53 AM IST

धुळे - हिंदू धर्मियांसाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यातील सोमवारी महादेवाची विधिवत पूजा केली जाते. धुळे शहर आणि जिल्ह्यात महादेवाची अनेक मंदिरे आहेत. यांपैकी एक जमनागिरी महादेव मंदिरात सध्या भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.


धुळे जिल्हा अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. धुळे शहर आणि जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक मंदिरे असून शहरातील जमनागिरी महादेव मंदिर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. २०० वर्षांपूर्वी, १८६७ ला सद्गुरू जमनागिरी महाराजांना ब्रिटिशांनी दान केलेल्या जमिनीवर हे महादेव मंदिर उभारण्यात आले होते. छोटेसे पण अतिशय सुबक असलेले हे महादेव मंदिर आजही सुस्थितीत आहे. मंदिराच्या समोरच जमनागिरी महाराजांची समाधी असून श्रावण महिन्यात याठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. महाराष्ट्रासह परराज्यातून देखील भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात. अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली पायविहीर आजही याठिकाणी पाहायला मिळते. उज्जैनहून त्रंबकेश्वराला जाणाऱ्या भाविकांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून अहिल्याबाई होळकरांनी याठिकाणी पायविहीर बांधली होती.
अनेक भाविक याठिकाणी नवस करतात, तसेच नवस पूर्ण झाल्यावर डाळ बाटीचा नैवेद्य महादेवाला दाखवतात. या मंदिराचा कारभार जमनागिरी महाराजांची ८वी पिढी सांभाळत आहे. मंदिराच्या आवारात गोरक्ष चिंचेचे मोठे झाड असून याठिकाणी सापांचा मुक्त वावर असतो. नागपंचमीला याठिकाणी नागाची पूजा करण्यासाठी अनेक भाविक येतात. अतिशय शांत आणि निसर्गरम्य असा हा परिसर असून प्रत्येकाने एकदा तरी याठिकाणी भेट द्यावी असे हे ठिकाण आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details