धुळे - शेतकऱ्यांना 50 हजार एकरी मदत राज्य सरकारने पंचनामे न करता दिली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने आज संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक मागण्यासंदर्भात निवेदन देत राज्य सरकार विरोधात आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर महादेव जानकर हे आज धुळे येथे आले होते. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडीने जाऊन मोर्चा काढण्यात आला. यावेळी धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या सादर करण्यात आल्या.
'राज्य सरकारने पंचनामे न करता शेतकऱ्यांना 50 हजार एकरी मदत दिली पाहिजे' - महादेव जानकर धुळे आंदोलन बातमी
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडीने जाऊन मोर्चा काढण्यात आला. यावेळी धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या सादर करण्यात आल्या.
महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून, पंचनामे न करता शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी, या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या क्युमाईन क्लब येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी महादेव जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मागील काळात जेव्हा राज्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, तेव्हा फडणवीस सरकार असताना उद्धव ठाकरे हे फडणवीस सरकारमध्ये सामील होते व त्यावेळी उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारकडे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये देण्याची मागणी केली होती. परंतु, आता उद्धव ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांनी आता महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना पंचनामे न करताच 50 हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी, अशी मागणी जानकर यांनी केली आहे.