महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यात प्रियकरानेच केली नवविवाहितेची हत्या - नरेंद्र भदाणे

नववधूच्या प्रियकराने प्रेमभंगातून तिचा गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

रेणुका धनगर

By

Published : Mar 27, 2019, 2:26 AM IST

धुळे - शिरपूर येथे नववधूच्या प्रियकराने प्रेमभंगातून तिचा गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शिरपूर फाटा परिसरात असलेल्या संगीत रेसिडेन्सी पार्क येथे ही घटना घडली.

घटनेनंतर मारेकरी प्रियकराने युवतीच्या आईला फोन करून मुलीला जीवे मारल्याची माहिती दिली. या घटनेनंतर मारेकरी फरार झाला आहे. शिरपूर येथील रेणुका धनगर (वय २२) या युवतीचे २३ मार्चला लग्न झाले. मात्र, लग्नाआधी तिचे शिरपूरातील नरेंद्र एकनाथ भदाणे उर्फ पप्पू शेटे याच्याशी प्रेमसंबंध होते. २४ तारखेला रेणुका माहेरी आली होती. सोमवारी सकाळी पप्पूने तिला फोन करून शिरपूरला बोलावले. शिरपूरला वेळ लागेल म्हणून तिने आपला मोबाईल जातोडा या आपल्या गावातील घरी ठेवला होता. शिरपूरला आल्यावर या दोघांनी संगीत रेसिडेन्सी पार्क याठिकाणी रूम बुक केली होती. याठिकाणी गेल्यावर पप्पूने रेणुकाचा गळा चिरून खून केला. या घटनेनंतर तो तिथून बाहेर पडला. यानंतर त्याने रेणुकाच्या मोबाईलवर फोन केला. हा फोन रेणुकाच्या आईने उचलला. यावर तुम्ही माझे रेणुकाशी लग्न होऊ दिले नाही, म्हणून मी तिला मारले. आता मीही आत्महत्या करत आहे, असे पप्पूने सांगितले. तसेच तिचा मृतदेह संगीता लॉजवर असल्याचीही माहिती दिली.

घटनास्थळ

या फोनमुळे हादरलेल्या रेणुकाच्या आईने एकच हंबरडा फोडला. ही घटना संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. रेणुकाचे नातेवाईक याठिकाणी आल्यावर सगळ्या घटनेचा उलगडा झाला. या प्रकरणी पोलीस पप्पू शेट याचा शोध घेत असून, दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

ABOUT THE AUTHOR

...view details