धुळे- महापालिकेत आयोजित करण्यात आलेल्या महासभेत विकास कामांच्या मुद्द्यावरून शनिवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा देखील प्रयत्न झाला. यावेळी संतप्त झालेल्या महापौरांकडून शिवराळ भाषेचा वापर झाला.
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक हेही वाचा -विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांची शिकवण देणे गरजेचे; धुळ्यातील शिक्षकांच्या प्रतिक्रिया
धुळे महापालिकेच्या स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात शनिवारी महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या महासभेच्यावेळी सदस्यांसाठी प्रश्न-उत्तराचा तास घेण्यात यावा, अशी मागणी महापौर चंद्रकांत सोनार यांच्याकडे करण्यात आल्यानंतर मागणीला मंजुरी देण्यात आली. उपस्थित सदस्यांनी आपल्या प्रभागातील समस्यांचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. त्यानंतर विरोधी पक्षातील नगरसेवकांनी धुळे शहराला दररोज पाणी पुरवठा करण्याच दिलेलं आश्वासन होत की जुमला? असा फलक झळकवला.
हेही वाचा -जलसंवर्धनाची सुरुवात ही आपल्या घरापासून करणे गरजेचे, धुळेकरांचे मत
तसेच विरोधी पक्षातील काही नगरसेवकांनी मुस्लीम बहुल भागात विकास कामांच्या बाबतीत तसेच अन्य कामांच्या बाबतीत अल्पसंख्याक नागरिकांच्या प्रभागावर अन्याय होत असल्याचा आरोप केला. तर नगरसेवक साबीर शेख यांच्या सांगण्यावरून 'अल्पसंख्याक बस्ती पानी मे, धुळे महापालिका मस्ती मे, असा फलक नगरसेवकांनी झळकवला. यावरून महापौर चंद्रकांत सोनार आणि नगरसेवक साबीर शेख यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली.
यावेळी दोन्ही पक्षातील नगरसेवकांकडून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा देखील प्रयत्न झाला. यावेळी संतप्त झालेल्या नगरसेवक साबीर शेख यांनी अल्पसंख्याक प्रभागावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात सभागृहात ठिय्या आंदोलन केले. महापौर चंद्रकांत सोनार यांच्याकडून शिवराळ भाषेचा देखील वापर झाला. मात्र, काही वेळाने महापौरांच्या आश्वासनानंतर हा वाद निवळला. अल्पसंख्याक प्रभागातील समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर महासभा सुरळीत सुरू झाली.