महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यात ऊस तोडणीवेळी आढळले बिबट्याचे 4 बछडे, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण - शेतात आढळले बिबट्याचे बछडे

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर देगाव येथील एका शेतात ऊसतोडीचे काम सुरू असताना मजुराला शेताच्या मध्यभागी बिबट्याचे ४ बछडे दिसून आले.

dhule
बिबट्याचे बछडे आढळल्याने शेतकरी भयभीत

By

Published : Dec 13, 2019, 1:17 PM IST

धुळे -जिल्ह्यातील पिंपळनेर देगाव येथील एका शेतात ऊस तोड चालू असताना बिबट्याचे ४ बछडे आढळून आले. यामुळे परिसरातील सर्व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबट्याचे बछडे आढळल्याने शेतकरी भयभीत

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर देगाव येथील एका शेतात ऊसतोडीचे काम सुरू असताना मजुराला शेताच्या मध्यभागी बिबट्याचे ४ बछडे दिसून आले. हे बछडे दिसताच भीतीने त्यांनी तिथून पळ काढला आणि शेतमालकाला कळविले. बिबट्याचे बछडे आढळल्याची बातमी पसरताच गावकऱ्यांनी शेतात गर्दी केली. बछड्यांना काही धोका पोहचू नये म्हणून काही ग्रामस्थांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह शेतात भेट देऊन पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांना सध्या त्या परिसरात न जाण्याच्या सल्ला दिला आहे. मात्र, यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details