धुळे - ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील हे विजयी झाले आहेत. कुणाल पाटील यांच्या विजयामुळे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे. कुणाल पाटील यांच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे कुणाल पाटील विजयी
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील आणि भाजपच्या उमेदवार ज्ञानज्योती भदाणे यांच्यात मुख्य लढत होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही कुणाल पाटील यांनी लोकसभा लढवली होती.
हेही वाचा-यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्या नेत्यांची बंडखोरी सपशेल फेल
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील आणि भाजपच्या उमेदवार ज्ञानज्योती भदाणे यांच्यात मुख्य लढत होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही कुणाल पाटील यांनी लोकसभा लढवली होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या दारुण पराभवानंतर पुन्हा एकदा उभारी घेत कुणाल पाटील यांनी विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे चिरंजीव म्हणून कुणाल पाटील यांची संपूर्ण राज्यात ओळख आहे. विधानसभा निवडणुकीत कुणाल पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला चैतन्य प्राप्त करुन दिले आहे, कुणाल पाटील यांनी भाजपच्या ज्ञानज्योती भदाणे यांचा पराभव केला आहे. पुढील पाच वर्षात धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात अधिकाधिक विकास कामे करुन जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहील असं आश्वासन कुणाल पाटील यांनी विजया नंतर दिल आहे.