महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे मतदारसंघासाठी कुणाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल - alliance

धुळे लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांनी सोमवारी धुळे शहरातून शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सादर केला.

कुणाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

By

Published : Apr 9, 2019, 11:37 AM IST

धुळे -धुळे लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो समर्थक होते. यावेळी पाटील म्हणाले, आमचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.

कुणाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल


धुळे लोकसभा मतदार संघासाठी येत्या २९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची ९ एप्रिल ही शेवटची तारीख आहे. धुळे लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांनी सोमवारी धुळे शहरातून शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सादर केला.


यावेळी कुणाल पाटील यांच्यासमवेत अमरीश पटेल, माजी मंत्री हेमंत देशमुख, मालेगाव येथील अद्वय हिरे, तुषार शेवाळे, यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील एसएसव्हीपीएस महाविद्यालयापासून रॅली काढण्यात आली. या रॅलीत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे लोकसभा मतदार संघातून आमचा विजय निश्चित आहे, जनतेने आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया कुणाल पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details