धुळे - जिल्ह्यातील शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार काशीराम पावरा यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश झाला आहे. त्यामुळे आता आमदार पावरा यांच्या भाजप प्रवेशामुळे शिरपूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे आता पूर्णपणे बदलणार आहेत.
हेही वाचा -मी काँग्रेस सोडणार नाही, आमदार बोंद्रेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धुळे जिल्ह्यातून काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. काँग्रेसचे विधानसभेचे विद्यमान आमदार काशीराम पावरा यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात भाजपात प्रवेश केल्याने शिरपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला खिंडार पडले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पावरा यांच्या प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावरा यांच्या भाजपा प्रवेश याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, अखेर या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपकडून काशीराम पावरा हे उमेदवारी करतात का ? आणि त्यांना शह देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी कोण उमेदवार उभे करतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
हेही वाचा -बुद्ध समजायला बुद्धी लागते, जितेंद्र आव्हाडांचा भिडेंना टोला