धुळे - सध्या पत्रकारितेच्या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. मात्र, या क्षेत्रात अभ्यासपूर्ण काम करणाऱ्या तरुणांची गरज असल्याचे वक्तव्य धुळ्यातील जेष्ठ पत्रकार अनिल चव्हाण यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केले. तसेच तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पत्रकारिता करणे सोपे झाल्याचेही ते म्हणाले.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पत्रकारिता करणे सोपे - जेष्ठ पत्रकार अनिल चव्हाण
पत्रकारितेच्या क्षेत्रात अभ्यासपूर्ण काम करणाऱ्या तरुणांची गरज असल्याचे वक्तव्य धुळ्यातील जेष्ठ पत्रकार अनिल चव्हाण यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केले. तसेच तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पत्रकारिता करणे सोपे झाल्याचेही ते म्हणाले.
जागतिक पत्रकार दिन ३ मे रोजी साजरा केला जातो. जागतिक पत्रकार दिनानिमित्त धुळे शहरातील जेष्ठ पत्रकार अनिल चव्हाण यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला. आज पत्रकारितेसमोर अनेक आव्हाने वाढली आहेत. पूर्वीच्या काळी पत्रकारिता करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पत्रकारिता करणे सोपे झाले आहे. मात्र, आज अनेकजण आकर्षण म्हणून पत्रकारीतेत येतात. त्यातील कितीजण समाजासाठी काम करतात हे महत्वाचे आहे. पत्रकारिता ही तपश्चर्या आहे. अधिक वाचन करणे, जगातील घडामोडींचा अभ्यास करणे आणि अभ्यासात सातत्य ठेवणे गरजेचे असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.