धुळे -महसूल, पोलीस आणि वनविभागाने शिरपूर तालुक्यात दोन ठिकाणांवर गांजा शेतीवर संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुमारे 20 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आदिवासीबहुल शिरपूर तालुक्यात बर्याच शहरात गांजा पिकाला बहर आला आहे. मात्र गावपातळीवरील अधिकारी ते थेट वरपर्यंत सर्वांचे आर्थिक लागेबांधे असल्याने दिवसेंदिवस गांजा क्षेत्राच्या प्रमाणात वाढ होत होती. काही लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न ऐरणीवर आणला असून त्यामुळे आता या तीनही विभागांनी मिळून गांजा शेतीच्या विरोधात शोधमोहीम हाती घेतली आहे.
धुळे जिल्ह्यातील आदिवासी बहुल लोकसंख्या असलेल्या शिरपूर धडगाव सह अन्य भागात अमली पदार्थांच्या उत्पादनात शासकीय अधिकाऱ्यांची टोळीच कार्यरत आहे. एकट्या शिरपूर तालुक्यात अंदाजे दीड हजार एकर जमिनीवर कांद्याची शेती केली जाते. मध्यप्रदेशच्या सीमेलगत असलेल्या कपाशीच्या शेतात एकाआड एक गांजाच्या ओळी लावल्या आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणात गांजाची शेती केली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून गांजा लागवड क्षेत्रात वाढच होत चालली आहे. धुळे जिल्ह्यातील गुंड बदमाश यांच्या गेल्या महिनाभरात या भागात चकरा वाढल्या असून तलाठी पोलिसांना वनाधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून मोठ्या प्रमाणात खंडणी गोळा करण्याच्या नव्या व्यवसायाने या भागात जन्म घेतला असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी जाहीर प्रसिद्धी पत्रकान्वये केला होता.
शिरपूर तालुक्यात पोलीस व वनविभागाची संयुक्त कारवाई, 20 लाख रुपयांचा गांजा जप्त - धुळ्यात पोलीस व वनविभागाची संयुक्त कारवाई
धुळे महसूल, पोलीस आणि वनविभागाने शिरपूर तालुक्यात दोन ठिकाणांवर गांजा शेतीवर संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुमारे 20 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे
वनपट्टे तपासणी करताना आढळला गांजा -
महसूल पोलीस व वनविभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वनपट्टे महसूल जमिनींची तपासणी करण्यात आली यावेळी गांजा शेती करणारे काही शेतकरी आढळून आले खिलारे व लाकडे हनुमान या गावांच्या शिवारातील बंद जमिनींच्या तपासणीवेळी रतनसिंग पाडवी यांच्या शेतात गांजा पीक तर लाकड्या हनुमान शिवारात राहूज्या नाना पाडवी यांच्या शेतात गांजा वळवायला घातलेला आढळला. दोघांविरुद्ध एनडीसीपीएस गुन्हे अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे प्रथम सिंग पाडवी यांच्या शेतात १२ लाख १० हजार किमतीची गांजाची झाडे मिळाली तर आहुजा पाडवी यांच्या शेतात आठ लाख 15 हजार रुपये किमतीचा गांजा सापडला हे दोघे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे
वनपट्टे शासन जमा होणार -
वनविभागाकडून संबंधितांच्या लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून वनपट्टे शासन जमा केले जाणार आहेत. वनपट्टे शासन जमा करण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी यांच्या मदतीने वनविभाग लवकरच करणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली तत्पूर्वी पोलिस दलाकडून गांजा लागवडीबाबत केलेल्या कारवाईची विस्तृत माहिती घेतली जाणार आहे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल तसेच तलाठी मंडळ अधिकारी यांना महसूल वनजमिनींवर याबाबत पाहणी करण्यासाठी तसेच बारीक लक्ष ठेवण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.