शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून पर्यटनमंत्री जयकुमार रावल चौथ्यांदा विजयी - maharashtra assembly election result 2019
रावल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांनी पर्यटन व रोहयो खात्यात गेल्या 3 वर्षात चांगली कामगीरी केलेली आहे. शिंदखेडामधून राष्ट्रवादीने रावल यांना पाडण्यासाठी डाव आखला होता.
जयकुमार रावल चौथ्यांदा विजयी
धुळे - पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचा शिंदखेडा मतदारसंघात दणदणीत विजय झाला आहे. रावल हे या मतदार संघातून चौथ्यांदा विजयी झाले आहेत. परदेशात बिझिनेस मॅनेजमेंटचे शिक्षण रावल यांनी घेतलेले आहे. रावल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांनी पर्यटन व रोहयो खात्यात गेल्या 3 वर्षात चांगली कामगीरी केलेली आहे. शिंदखेडामधून राष्ट्रवादीने रावल यांना पाडण्यासाठी डाव आखला होता. मात्र, तो फोल ठरला.