धुळे- लोकसभेत सोमवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी या विधेयकाला विरोध होत आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात जमीयत उलेमा हिंद या संघटनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. तसेच हे विधेयक रद्द करण्यात यावे, या मागणीचे उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना निवेदनही देण्यात आले.
नागरिकत्व दुरुस्ती विधयेकाविरोधात 'जमीयत उलेमा हिंद'चे आंदोलन - नागरिकत्व दुरुस्ती विधयेक
भारताची ओळख ही धर्मनिरपेक्ष देश म्हणून आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सत्तेवर आलेल्या सरकारने ही ओळख पुसण्याचे काम सुरू केले आहे. त्यातही मुस्लीम धर्मीय बांधवांवर वेळोवेळी अन्याय केला जात आहे, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
भारताची ओळख ही धर्मनिरपेक्ष देश म्हणून आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सत्तेवर आलेल्या सरकारने ही ओळख पुसण्याचे काम सुरू केले आहे. त्यातही मुस्लीम धर्मीय बांधवांवर वेळोवेळी अन्याय केला जात आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे मुस्लीम विरोधी आहे. एकीकडे देश आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार होत आहेत. मात्र, या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून भाजप सरकारने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पारित करून या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचे काम केले आहे, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.