धुळे - संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या जळगाव घरकुल घोटाळ्याचा निकाल आता 27 जूनला जाहीर होणार आहे. 22 जूनपर्यंत कोर्ट सुट्टीवर असल्याने हा निकाल लांबणीवर पडला आहे.
बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणाचा निकाल 27 जूनला - न्यायाधीश डॉ सृष्टी निलकंठ
या घरकुल घोटाळ्याचा निकाल गेल्या महिन्यात 21 मे ला जाहीर होणार होता. मात्र, त्यावेळी या प्रकरणातील काही संशयित हजर नसल्याने आणि निकाल पूर्ण लिहून न झाल्याने हा निकाल 7 जून ला जाहीर केला जाणार होता. मात्र, आता 22 जूनपर्यंत कोर्ट सुट्टीवर असल्याने आता हा निकाल 27 जून ला जाहीर केला जाणार आहे.

डॉ. सृष्टी नीलकंठ या न्यायाधीश म्हणून या प्रकरणाचे कामकाज बघत आहेत. आज निकाल जाहीर होणार असल्याची उत्सुकता लागून असल्याने धुळे जिल्हा न्यायालय आवारात सुरेश जैन यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आता या घरकुल घोटाळ्याचा निकाल 27 जूनला जाहीर करण्यात येईल, अशी माहिती न्यायाधीश एसआर उगले यांनी दिली. यामुळे 27 जूनला काय निकाल लागतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.