धुळे- जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी याठिकाणी होणारी दारूची अवैध वाहतूक रोखण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे. कारवाईत पथकाने ७० लाख ०२ हजार ५०० रुपयांचा दारूसाठा जप्त केला असून 4 आरोपींना अटक केली आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाईचा धडाका लावल्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
धुळ्यात 70 लाख रुपयांचा दारूसाठा जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - state excise department sangvi liquor seized
याप्रकरणी धर्मराज जिले सिंह (रा.हरियाणा), मंजुनाथ रामअण्णा सिरंजी (रा.कर्नाटक), ओमप्रकाश रामफल जत्त्त (रा.हरियाणा) परवीन धर्मवीर लसकरी (रा.हरियाणा) या चौघांना अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील मुंबई-आग्रा महामार्गावर दारूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून याठिकाणाहून (एच.आर.६१ ए.९८८९) क्र. टाटा कंपनीचा टँकर ज्यात २१ हजार लिटर दारूचे ब्यारल, (एच.आर ५५ एन.०६११) क्र. टाटा कंपनीचा टँकर ज्यात २५ हजार लिटर दारूसाठा, आयशर कंपनीचा टेम्पो ज्यात २०० लिटर क्षमतेचे २२ प्लॅस्टिकचे ब्यारल, (एम.एच १८ ए.ए ६६४२) क्रमांकाची महिंद्रा कंपनीची पिकअप व्हॅन ज्यात २०० लिटर क्षमतेचे ८ प्लॅस्टिक ब्यारल, असा सुमारे ७० लाख २ हजार ५०० रुपये किंमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी धर्मराज जिले सिंह (रा.हरियाणा), मंजुनाथ रामअण्णा सिरंजी (रा.कर्नाटक), ओमप्रकाश रामफल जत्त्त (रा.हरियाणा) परवीन धर्मवीर लसकरी (रा.हरियाणा) या चौघांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा-धुळ्यात वसतिगृहामध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या, कारण अस्पष्ट