महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुंपनच जेव्हा शेत खाते..! धुळ्यामध्ये पोलिसांकडूनच अवैध वाळू उपसा - धुळे

शुक्रवारी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 चे कर्मचारी शासनाच्या गाड्या आणून पांझरा नदी पात्रात अवैधरित्या वाळूचा उपसा करत होते.

कुंपनच जेव्हा शेत खाते..! धुळयामध्ये पोलिसांकडूनच अवैध वाळू उपसा

By

Published : Jun 22, 2019, 6:12 PM IST

धुळे - धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे पोलिसांनीच अवैधरित्या वाळू उपसा केल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 चे कर्मचारी शासनाच्या गाड्या आणून पांझरा नदी पात्रात अवैधरित्या वाळूचा उपसा करत होते. हा प्रकार गेल्या 6 महिन्यांपासून सुरू असून याला कोण आळा घालणार ? हा मोठा प्रश्न आहे. तर हा वाळू उपसा त्वरित थांबवावा, अशी मागणी कुसुंबा येथील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

वाळू उपसा करताना पोलीस

संपूर्ण धुळे जिल्ह्यात अवैधरित्या वाळूचा उपसा सर्रासपणे सुरू आहे. याकडे प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. वाळूचा उपसा केल्याने नदीमधील पाण्याची पातळी खालावते, परिणामी नदी कोरडी पडते, अशा वेळी वाळूचा अवैधरित्या होणारा उपसा थांबवून संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची गरज असते. मात्र, प्रशासनाचे आर्थिक हितसंबंध जोपासले जात असल्याने प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

कुंपनच जेव्हा शेत खाते..! धुळयामध्ये पोलिसांकडूनच अवैध वाळू उपसा

धुळे जिल्ह्यात वाळू माफियांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, जर कुंपणच शेत खात असेल तर कारवाई कोणावर करायची ? असा प्रश्न पडतो. याचाच प्रत्यय धुळे तालुक्यातील कुसुंबा गावात पाहायला मिळत आहे. धुळे तालुक्यातील कुसुंबा गावात गेल्या 6 महिन्यांपासून राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 चे कर्मचारी हे शासनाच्या गाड्या आणून पांझरा नदी पात्रात अवैधरित्या वाळूचा उपसा करत आहेत. तर 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा होत असताना याठिकाणी पोलीस कर्मचारी नदी पात्रातून वाळूचा उपसा करण्यात मग्न होते. पोलिसांची गाडी आणि स्वतः पोलीस या ठिकाणी वाळूचा उपसा करण्यासाठी येत असल्याने याबाबत बोलण्याचे नागरिकांचे धाडस होत नाही.

त्यामुळे गावकरी प्रसारमाध्यमांसमोर येऊन बोलण्यास नकार देत आहेत. याबाबत गावकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, आम्हाला प्रभारी समादेशक सदाशिव पाटील यांचे आदेश आहेत, असे पोलिसांनी सांगितले. तसेच ही वाळू शासनाच्या मंजूर कामांसाठी वापरण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details