महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यात गावठी पिस्तूलासह जिवंत काडतुसे जप्त; शहर पोलिसांची कारवाई

हे गावठी पिस्तुल आपण मोहसीन खान (वय २२, रा. मिल्लतनगर, धुळे) याच्या मध्यस्थीने मयूर कंडारे यांच्याकडून विकत घेतल्याची कबुली त्याने दिली.

गावठी पिस्तूल आणि जिंवत काडतूसासह अटक केलेले आरोपी

By

Published : Apr 23, 2019, 3:12 AM IST

धुळे - शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई करत एक गावठी पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना ताब्यातही घेतले आहे.

धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. गावठी पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसे या कारवाईत जप्त करण्यात आले. किशोर मोरे नामक व्यक्ती हा गावठी पिस्तुल बाळगून असल्याची तसेच त्याने काही जणांना दमदाटी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे किशोर मोरेला शहरातील राजीव गांधी नगरात असलेल्या त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. त्याची विचारपूस केली असता त्याने आपल्याकडे गावठी पिस्तुल होती मात्र आपण ती फेकून दिल्याची माहिती दिली.

पोलीस केलेल्या कारवाईची माहिती देताना
मोरेनी दिलेल्या माहितीवर विश्वास न ठेवता पोलिसांनी त्याची परत चौकशी केली. यानंतर मोरेच्या घराची झडती घेतली असता त्याने आपल्या घरातून २५ हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसे काढून दिले. हे गावठी पिस्तुल आपण मोहसीन खान (वय २२, रा. मिल्लतनगर, धुळे) याच्या मध्यस्थीने मयूर कंडारे यांच्याकडून विकत घेतल्याची कबुली त्याने दिली.पोलिसांनी मोहसीन खान आणि मयूर कंडारे यांना ताब्यात घेतले असता त्यांनीही गुन्ह्याची कबुली दिली. ऐन निवडणुकीच्या काळात यांच्याकडे गावठी पिस्तुल आले कसे, त्यामागील संबधित आरोपींचा उद्देश काय होता याचा तपास पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details