धुळे- जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दारखेल येथील उसतोड मजुराने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. कलाबाई माळी असे मृत पत्नीचे नाव आहे. आरोपी संजय सुधाकर माळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-'सीएए संदर्भात बचावात्मक पवित्रा घेण्याची गरज नाही'
साक्री तालुक्यातील कासारे येथील संजय सुधाकर माळी याला एक मुलगा व दोन मुली आहेत. दोन महिन्यांपासूनसंजय पत्नी आणि मुलींसह गुजरात राज्यात ऊस तोडणीसाठी गेला होता. संजय हा चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला वारंवार मारहाण करत होता.
दरम्यान, संजयने कलाबाई यांच्या माहेरी फोन करून तिची हत्या केल्याचे सांगितले. त्यांचे नातेवाईक तत्काळ घटनास्थळी आले. त्यावेळी कलाबाई रक्ताच्या थोराळ्यात पडल्या होत्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. याप्रकरणी कलाबाई यांच्या आई लक्ष्मी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संजय माळी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.