धुळे-शहरातील प्रभाग क्रमांक 8,9 आणि 10 मध्ये प्रशासनाच्यावतीने 100 टक्के लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याची रंगीत तालीम बुधवारी नंतर गुरुवारी देखील केली जाणार आहे.
CORONA : धुळे शहरातील काही भागात 100 टक्के लॉकडाऊन - धुळे
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यास कोणत्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे, याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी धुळे प्रशासनाच्या वतीने शहरातील मच्छीबाजार, जुने धुळे, मौलवी गंज यासह विविध भागांमध्ये 100 टक्के लॉकडाऊन जाहीर केला आहेo
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यास कोणत्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे, याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी धुळे प्रशासनाच्या वतीने शहरातील मच्छीबाजार, जुने धुळे, मौलवी गंज यासह विविध भागांमध्ये 100 टक्के लॉकडाऊन जाहीर केला आहे. या भागातील नागरिकांना शहरात जाण्यासाठी तसेच शहराच्या विविध भागातील नागरिकांना या भागात येण्यासाठी पुढील दोन दिवस बंदी घालण्यात आली आहे.
दोन दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान मनपा प्रशासनाच्यावतीने जंतुनाशक फवारणीसह विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. शहराच्या विविध भागात याची रंगीत तालीम करण्यात येणार आहे. बुधवारपासून याला सुरवात झाली असून यावेळी महापौर चंद्रकांत सोनार यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. मात्र, यावेळी या भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.