धुळे -गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्या येथील रामजन्मभूमीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. या निकालाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे सगळ्यांनी स्वागत करावे, असे आवाहनही पोलीस प्रशासनाने केले आहे.
धुळे: अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त - अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात सुरक्षा
शहरासह जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलिसांनी पावले उचलली आहेत. याशिवाय, सोशल मीडियावरही पोलिसांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, समाजातील विविध घटकही शांततेचे आवाहन करण्यासाठी पुढे सरसावत आहेत.
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त
हेही वाचा - अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात कलम 144 लागू
धुळे शहरासह जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलिसांनी पावले उचलली आहेत. याशिवाय, सोशल मीडियावरही पोलिसांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, समाजातील विविध घटकही शांततेचे आवाहन करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. न्यायालयाच्या निकालाचा आदर करून कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्याची विनंती धुळे पोलिसांनी केली आहे.