धुळे- गुजरातच्या हिरे व्यापाऱ्याचा धुळे शहराजवळील दोंडाईचा-सोनगीर रोडवर खून झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोपाल मोतीलाल काबरा, असे खून झालेल्या हिरे व्यापाऱ्याचे नाव आहे.
गुजरातच्या हिरे व्यापाऱ्याचा धुळ्यामध्ये खून, परिसरात खळबळ - व्यापारी
गुजरातच्या हिरे व्यापाऱ्याचा धुळे शहराजवळील दोंडाईचा-सोनगीर रोडवर खून झाला आहे.

दोंडाईचा-सोनगीर रोडवर एका कारच्या (स्विफ्ट डिझायर के.ई. 6095) बाजुला एका अज्ञात व्यक्तीचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह परिसरातील नागरिकांना दिसला. त्यानंतर नागरिकांनी या घटनेची पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली.
त्यावेळी खून झालेली व्यक्ती गुजरात येथील हिरे व्यापारी गोपाल मोतीलाल काबरा असल्याचे समोर आले. या प्रकरणी शोध घेण्यासाठी पोलिसांनी फिंगर प्रिंट तज्ञ, श्वान पथकाची मदत घेतली. मात्र, श्वान पथकाने काही अंतरापर्यंतच मार्ग दाखवला. या व्यापाऱ्याचा खून करुन अज्ञातांनी रोख रक्कम व ऐवज लुटून नेल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.