धुळे- जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर अद्याप जिल्ह्याचा आढावा घेतला नसल्याचे वृत्त 'ईटीव्ही भारत'वर 30 मार्चला प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पालकमंत्र्यांनी दूरध्वनीवरून संवाद साधत जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील सध्यस्थितीबाबत माहिती जाणून घेतली आहे.
ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी घेतला धुळे जिल्ह्याचा आढावा - Corona virus
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्याचा आढावा तसेच प्रशासनाने केलेली तयारी याबाबत पालकमंत्र्यांनी माहिती जाणून घेणे आवश्यक होते. मात्र, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आढावा 2 एप्रिलपर्यंत आढावा घेतला नव्हता.
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्याचा आढावा तसेच प्रशासनाने केलेली तयारी याबाबत पालकमंत्र्यांनी माहिती जाणून घेणे आवश्यक होते. मात्र, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आढावा 2 एप्रिलपर्यंत आढावा घेतला नव्हता. त्यानंतर ईटीव्ही भारतने याबाबत वृत्त प्रसारित करताच सत्तार यांनी 2 एप्रिलला गुरूवारी दूरध्वनीवरून जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत जिल्हातील परस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच त्यांनी नागरिकांच्या अन्नधान्याची सोय करण्याबाबत काही सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत.