धुळे - भारतात आणि महाराष्ट्रात सध्या लोकसभेसाठी मतदान सुरू आहे. महाराष्ट्रातील १७ लोकसभा मतदारसंघासाठी आज २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. देशभरात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. सोबतच लग्नसराईचा हंगाम देखील सुरू आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातील पाटणच्या मतदान केंद्रावर नवरदेवाने लग्नाआधी मतदानचे कर्तव्य बजावत मतदान करण्याचा संदेश दिला आहे.
आधी मतदान मग लग्न...धुळ्यात नवरदेवाने केली मतदानजागृती - लग्न
अजयने आधी मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर त्याने लग्न केले.

आज मतदान प्रक्रिया पार पडत असताना दुसरीकडे मात्र, शुभमुहर्त असल्यामुळे लग्नसराई देखील सुरू आहे. शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील नवरदेव अजय मालचे याने लग्नाआधी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याला महत्व दिले. अजयने आधी मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर त्याने लग्न केले.
अजयने बाहेरगावी लग्न असताना देखील आधी सर्वाना मतदान करण्याचा आग्रह केला आणि सर्वांना जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर घेवून जात मतदानासाठी प्रोत्साहीत केले. मतदान जागृतीबद्दल अजयची धडपड पाहून सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे.