धुळे -तालुक्यातील सोनेवाडी गावात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा धनादेश काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून 16 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या ग्रामसेविका पूजा प्रकाश ठाकरे यांस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून या प्रकरणी ग्रामसेविका पूजा ठाकरे यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे तालुक्यातील सोनेवाडी गावातील खासगी ठेकेदाराने ग्रामपंचायती अंतर्गत 2 घरकुल, 7 शौचालय आणि भूमिगत गटारीचे बांधकाम केले आहे. पण, त्यांना अद्यापपर्यंत केलेल्या कामाचा धनादेश देण्यासाठी ग्रामसेविका पूजा ठाकरे यांनी 16 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदारांनी या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शहानिशा करून ग्रामसेविका पूजा ठाकरे यांना 16 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली, असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सुनील कुऱ्हाडे यांनी दिली.
ही कारवाई धुळ्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर सोनवणे, संदीप सरग, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर आदींच्या पथकाने यशस्वी केला.
लाच स्वीकारताना ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात - धुळे गुन्हे बातमी
धुळे तालुक्यातील सोनेवाडी गावात करण्यात आलेल्या विकास कामांना धनादेश काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना ग्रामसेविका पूजा ठाकरे यांस रंगेहात अटक करण्यात आली आहे.
ग्रामसेविका पूजा ठाकरे