महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यात दहाव्या दिवशी गणरायाला निरोप

धुळे शहर आणि जिल्ह्यात गणरायाला दहाव्या दिवशी निरोप देण्यात आला. अनेक घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन भक्तिमय वातावरणात पार पडले.

सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक

By

Published : Sep 12, 2019, 11:20 AM IST

धुळे - शहर आणि जिल्ह्यात गणरायाचे दहाव्या दिवशी (बुधवार) भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. मागील 10 दिवसांपासून सुरू असलेला गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी नागरिकांनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत 12 पावली नृत्य केले.

धुळ्यात दहाव्या दिवशी गणरायाला निरोप देण्यात आला

अनंतचतुर्दशीला सर्वत्र गणेश विसर्जन पार पडणार आहे. मात्र, काही ठिकाणी 10 व्या दिवशीच गणेश मूर्ती विसर्जन करण्याची प्रथा आहे. त्यामुळे अनेकांनी बुधवारीच गणेश मूर्तीचे विसर्जन केले. जिल्ह्यात अनेक घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन पार पडले.

हेही वाचा - मुंबईतील गणेशविसर्जन मिरवणुका लांबण्याची शक्यता

गणेश विसर्जनासाठी प्रशासनाच्या वतीने कृत्रिम तलाव तयार करण्यात आले. काही सार्वजनिक गणेश मंडळांनीदेखील आपल्या लाडक्या बाप्पाला दहाव्या दिवशीच निरोप दिला. मिरवणुकीच्या वेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या तालावर 12 पावली नृत्य करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी बंदोबस्त करण्यात आला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details